धडाड धुरळा उडतो गगनी
पुन्हा भय जनी दाटते गा
एकमेकां सारे सावरू धावती
निस्तरू पाहती पुन्हा तेच
सुटकेचा कोणी टाकती निःश्वास
कुणाचा प्रवास संपलेला
विव्हळत जागे कोणी वेदनांत
कुठे डोळियांत पाणी साचे
चित्रवाणीवर वृत्त साकळते
जगाला कळते घडले ते
परिस्थिती कोणी सांगे विवरून
काय हो कारण घडे त्याचे
निषेधाचे कुणी पेटवी पलिते
शांत राखा माथे म्हणे कोणी
कुणी म्हणे धन्य धन्य नागरिक
शूर नि सोशिक धैर्यवंत
उलटते रात येता येता नीज
पुन्हा नवा आज उजाडतो
भयशंका मनी दाटल्या घेऊन
चालती गा जन तीच वाट
कुजबुज कुठे संताप थोडासा
अगतिकचासा एक एक
पोट शिकविते धैर्य ते अटळ
अन्य काही बळ नाही तेथे
हा ब्लॉग शोधा
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
सुबोध
सुबोध (छायाचित्राचे श्रेय : श्री. आशिष आल्मेडा) माणसामाणसांतल्या संबंधांमागचं काही गणित असेलही. पण मला तरी अजून ते उलगडलेलं नाही. आपल्या...
-
संगणकीय सामग्रीचं वैशिष्ट्य काय आहे? तर ही सामग्री सहज प्रतीकरणीय आहे. म्हणजे संगणकीय स्वरूपात साठवलेलं पुस्तक, ध्वनिमुद्रण, गाणं, छायाचित्...
-
सुबोध (छायाचित्राचे श्रेय : श्री. आशिष आल्मेडा) माणसामाणसांतल्या संबंधांमागचं काही गणित असेलही. पण मला तरी अजून ते उलगडलेलं नाही. आपल्या...
-
अरुण फडके गुरुजी गेले. त्यांच्या मराठी लेखन-कोशाने मराठी प्रमाण/ शुद्ध लेखनाच्या क्षेत्रातली एक मोठी उणीव भरून काढली. अमुक शब्द कसा लिहायच...