हा ब्लॉग शोधा

गुरुवार, १४ जुलै, २०११

१३ जुलै २०११ आणि नंतर...

धडाड धुरळा उडतो गगनी
पुन्हा भय जनी दाटते गा
एकमेकां सारे सावरू धावती
निस्तरू पाहती पुन्हा तेच
सुटकेचा कोणी टाकती निःश्वास
कुणाचा प्रवास संपलेला
विव्हळत जागे कोणी वेदनांत
कुठे डोळियांत पाणी साचे

चित्रवाणीवर वृत्त साकळते
जगाला कळते घडले ते
परिस्थिती कोणी सांगे विवरून
काय हो कारण घडे त्याचे
निषेधाचे कुणी पेटवी पलिते
शांत राखा माथे म्हणे कोणी
कुणी म्हणे धन्य धन्य नागरिक
शूर नि सोशिक धैर्यवंत

उलटते रात येता येता नीज
पुन्हा नवा आज उजाडतो
भयशंका मनी दाटल्या घेऊन
चालती गा जन तीच वाट
कुजबुज कुठे संताप थोडासा
अगतिकचासा एक एक
पोट शिकविते धैर्य ते अटळ
अन्य काही बळ नाही तेथे

२ टिप्पण्या:

  1. ज्यांनी उपाययोजना करायची त्यांची अवस्था कोडग्या कोडग्या लाज नाही आजचा कोडगा उद्या नाही अशी आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. अधिक वाचकांपर्यंत जायला हवी ही कविता... एखाद्या वर्तमानपत्राला वा नियतकालिकाला पाठव.

    उत्तर द्याहटवा

सुबोध

  सुबोध   (छायाचित्राचे श्रेय : श्री. आशिष आल्मेडा) माणसामाणसांतल्या संबंधांमागचं काही गणित असेलही. पण मला तरी अजून ते उलगडलेलं नाही. आपल्या...