मराठीत हे नीट सांगता येतं
प्रसारमाध्यमांतलं मराठी ऐकताना वाचताना अनेकदा आपल्याला त्रास होतो. ते हिंदी वा इंग्रजी वळणाचं मराठी ऐकताना वाचताना आपण चडफडतो. पण नुसतं चडफडण्याने काही साधणार नाही. आपल्याला त्या अ-मराठी वळणाच्या प्रयोगांच्या जागी मराठी वळणाचे प्रयोग कोणते आहेत हे सुचवावं लागेल. ज्यांना व्यवस्थित मराठी बोलावंसं वाटतं त्यांच्यासाठी सहाय्य म्हणून खाली अशा प्रयोगांची सूची करून देत आहे.
अनेकदा अमुक शब्द मराठी नाही असं कळत असतं पण त्याला चपखल मराठी शब्द सुचत नाही. अशा वेळी ही सूची पाहता येईल.
शब्द
- चहलपहल : वर्दळ सकाळी ह्या ठिकाणी बऱ्यापैकी चहलपहल असते
- गळ (णे) : विरघळ (णे) गळेल की टिकेल
- दर्शक : प्रेक्षक मलिकेला दर्शकांचा पाठिंबा मिळतो आहे. (मराठीत दर्शक म्हणजे दाखवणारा. उदा. मार्गदर्शक/दर्शक विशेषण)
वाक्य/वाक्यांश/वाक्प्रचार
- माझी मदत कर : मला मदत कर
- काट्याची टक्कर : अटीतटीचा सामना
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा