आग कधीच लागली...

आग कधीच लागली
धूर आतासा दिसला
नित्य धुमसणे काल
भाग थोडासा पेटला

कशी विझवावी आग?
आणि कुणी विझवावी?
हीच चर्चा किती काळ
आता पुढे चालवावी?

मूठभर राखेचे ह्या
आता पुरे कवतिक
भवताली पसरला
आहे राखेचाच ढीग

दाह जाणवेल असे
थोडे हवे जितेपण
नाही तर नेहमीचे
भले आपले सरण

आग कधीची लागली
कुठे राख कुठे धूर
निववील ताप असा
मेघ अजूनही दूर


टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट